देवा ईतकी का डेशिंग करतोस…...

Started by सतीश भूमकर, September 30, 2013, 10:38:33 PM

Previous topic - Next topic

सतीश भूमकर

देवा ईतकी का डेशिंग करतोस......
तुझ्या या लेकरांवर इतकी का
खुन्नस धरतोस.....

इतकंच वाटतं तर दोन दिवस
पृथ्वीवर येउन बघ.....
बाहेरगावी जरा शिकायला राहून बघ....

आमच्या मेसच्या त्या जगप्रसिद्ध
पांचट भाज्या खाऊन बघ......

महिन्याभराचे कपडे एकदाच धुवून बघ...
आईच्या आठवणीत एखादी रात्र रडून बघ....

जिवलग मित्रांच्या विरहात जरा बाहेर राहून बघ....
चेलेंज झालं फक्त दोन दिवस राहशील

तिसऱ्या दिवशी घरी पळून जाशील
आईच्या कुशीत जाऊन खूप खूप रडशील
आणि तुझा पप्पाकडे हि सिस्टीम बदलायची शिफारस करशील......

@सतीश भूमकर...


सतीश भूमकर




anildgawali

एक बर  झाल, आपली व्यथा देवाजवळ मांडली, आपण तर हे सोसलं, देवाच्या पप्पाने मनावर घेतलं तर पुढच्याना हे सहन करावे लागणार नाही. प्रभावी रचना !!!       

सतीश भूमकर