न सांगता कळत कसे नाही तुला

Started by kavita.sudar15, October 04, 2013, 02:09:05 PM

Previous topic - Next topic

kavita.sudar15

प्रेम आहे तुझे मान्य आहे मला, न सांगता कळत कसे नाही तुला...!
  डोळे जिथे बोलतात तिथे शब्दांची उणीव का भासावी,
तुला मनातील माझ्या जाणून घेण्याची आस का नसावी....!
   सारे शब्दात सांगायचे कसे,
डोळ्यातील भाव चेहऱ्यावर दाखवायचे कसे....!
   तुला आस आहे तुझ्या माझ्या भेटीची,
मलाही जाणवते रे हुरहूर तुझ्या मनाची....!
  नजरेतील भाव माझे जाणून घे तू एकदा,
तुझ्या भेटीस मन माझे हि आतुर होते कितींदा....!
   क्षणाचा सहवास नको रे मला,
तुझीच सखी संगिनी व्हायचे आहे मला....!
   तुला कसे नाही कळत मन माझे,
तुझ्या जे ओठांवर तेच आहे स्वप्न माझे....!
   तुझ्यासवे सारे जग पाहायचे आहे,
आयुष्यातील सर्व सुख दुखे तुझ्यासवे जगायची आहेत....!
   प्रेम तुझे पण आहे, हे कळते रे मला,
नाही जगाची भीती मज, पण स्वतालाच फसवत आहे हे समजावू कसे तुला....!
  या निशब्द प्रेमास समजावेस तू, हेच सारखे वाटते,
आपल्या अबोल प्रेमास मोहोर येईल आता हेच भासते....!!!! @ कविता @