क्रांती

Started by केदार मेहेंदळे, October 04, 2013, 04:39:05 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

 
मात्रा वृत्त  (१७ + १७)

मी केवळ विषय काय मांडला, त्यांना अगोचरपणा वाटला
मी केवळ चर्चा सुरु केली, त्याना का तो विवाद वाटला?

मी जे उद्गार चिन्ह काढलं, त्यांना प्रश्नाचा भास झाला
मी जरा रेटून काय नेलं, त्यांच्या जगात वणवा पेटला

मी चौकसपणा थोडा केला, त्यांनी जुन्यांचा दाखला दिला
मी नुसता विषय काय मांडला, त्यांच्या भिंतीत जाळ पेटला

मी चालायला काय लागलो, त्यांनी सरळ पाय कलम केला
जे कोणी उभे राहिले जरा, त्यांचा तर शिरच्छेद जाहला

मी मान काय उचलली थोडी, त्यांनी खड्गानी वार केला
बरं झालं रक्त सांडलं ते, त्यातूनच नवा अंकुर फुलला

केदार.....