-किती धावशील-

Started by paresh, October 04, 2013, 05:23:51 PM

Previous topic - Next topic

paresh

-किती धावशील-

किती धावशील रे वेड्या पैस्या मागे,
ते थोडी संपून जातील,

जगून घे आयुष्य सुखाने,
धावू धावून दमशील,

नाही मिळणार विकत नाते,
आणि नाही मिळणार मायेची सावली,

नाही मिळणार ते जुने मित्र,
नाही मिळणार ती मैत्री,

किती धावशील रे वेड्या पैस्या मागे,
ते थोडी संपून जातील,

माहिती आहे आता मला,
किंमत फक्त पैशाला आहे,

पण अजूनही या जगात,
सर्वाना माणुसकीचा ध्यास आहे,

नाही मिळणार विकत हसू,
आणि नाही मिळणार विकत झोप,

म्हणून सांगतो नको धावू पैस्या मागे,
आता तरी शांत झोप ,

परेश .....