मस्त पड म्हणा

Started by shashaank, October 05, 2013, 11:09:16 AM

Previous topic - Next topic

shashaank

मस्त पड म्हणा

(झंप्या दामले)

सकाळी साखरझोपेतून उठून कामावर जायचे जीवावर आलेला माझा मित्र विवेक कुलकर्णी कुसुमाग्रजांच्या 'फक्त लढ म्हणा'च्या चालीवर म्हणाला - 'डोक्यावरती पांघरूण घेऊन फक्त झोप म्हणा'. मग मी विचार केला की याचा पूर्ण विस्तार करूया ... आणि दुपार पर्यंत विडंबन तयार सुद्धा झाले !

-------------------------------------------------------------------------------------
(आधी विडंबन-कविता आणि खाली मूळ कविता देखील संदर्भासाठी दिली आहे)

कविवर्य कुसुमाग्रज यांची क्षमा मागून
विडंबन - मस्त पड म्हणा

पार्श्वभूमी : गणपती मिरवणुकीत अचकट विचकट नाचणे हा प्रकार फार वाढलाय, त्यात परवाच्या विसर्जनाला मरणाचा पाऊस पडला. कल्पना करा अशी एक मिरवणूक संपवून एका मोठ्या मंडळाचा एक छोटा कार्यकर्ता मंडळाच्या अध्याक्षाकडे आलाय

'ओळखलत का भाऊ मला?' - पावसात आलं कोणी,
बापडं होतं फार दमलेलं, केसांवरती पाणी
दम खात बसला कसनुसा हसला बोलला वरती पाहून
'गणपती बाप्पा पाहुणे आले, गेले मांडवात राहून


डी जे वरती पोरं आपली चारचौघात नाचली
मोकळ्या तोंडी जातील कशी, खैनी सुद्धा पोचली
भिंत रचली, गाणी वाजली, नाचून सारे मेले
उस्ताद तुम्ही हातावरती चिंचोके हो ठेवले


पोरांना या घेऊन संगे काढता पाय घेतो आहे
भरल्या चपला पुसतो आहे चिखलगाळ काढतो आहे'


पिशवीकडे हात जाताच हसत हसत उठला
' 'चपटी' नको भाऊ मला जरा थकवा वाटला
झाला काटा ढिला तरी पडला नाही फणा
"डोक्यावरती पांघरूण घेऊन मस्त पड" म्हणा'


-------------------------------------------------------------------------------------
मूळ कविता

ओळखलत का सर मला?' पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,
'गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन'.
माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
'पैसे नकोत सर', जरा एकटेपणा वाटला.
कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिख्लगाळ काढतो आहे ,
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, फक्‍त लढ म्हणा !

- कुसुमाग्रज



Çhèx Thakare


dipak chandane

शशांक मस्त विडंबन लिहिलं आहेस. छान विचार आहे

केदार मेहेंदळे


Paresh Naik


शिवाजी सांगळे

शशांक, छान विडंबन जमल आहे.....  ;D :D
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९


सतिश

छान जमून आलेय... मस्तच..