५. ध्यानाचे प्रवेशद्वार

Started by विक्रांत, October 05, 2013, 11:16:06 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

ध्यानाची पुस्तके वाचली प्रवचने ऐकली कि सुरवातीला उत्साह असतो .आपण ध्यानाला बसतो ,थोडे नाम स्मरण करतो मन शांत होते ,मग मौनात जावू पाहतो  पण तो प्रवेश होत नाही म्हणून मग उतावीळ होतो .पुन्हा प्राणायाम,जप वगैरे करू पाहतो ,अन ध्यानाच्या मार्गावरून भटकतो       
      म्हणून काय करायचे या बद्दल आपण सावध असले पाहिजे .आपल्याला अकर्ता व्हायचे असते अक्रीयाशील अवस्थेत प्रवेश करायचा असतो.(करणे हा शब्द इथे नाईलाजाने वापरावा लागतोय.) परंतु मन धावत असते विचारांचे मोहळ उठते आणि आपण त्यात हरवतो हे सत्य स्वीकारणे हा एक महत्वाचा पडाव असतो .इथे एकच गोष्ट हातात असते ते म्हणजे पाहणे ...
      आपण आपल्या विचाराकडे पाहणे .विचार पाहणारा मी हा त्या क्षणी विचारा  पासून वेगळा होतो क्षणभर विचार रहित होतो अन मी पाहतो आहे या विचारात दुसऱ्या क्षणी अडकतो .विचार शब्द रुपात येतात आणि चित्र रुपात पण बहुदा दोघांच्या मिश्रणात.त्या विचाराकडे हा विचार चांगला, हा वाईट असे पाहत त्यांचे मूल्यमापन करीत बसणे हे विचार साखळी पुढे चालवणे होते .
     मग विचारांचे अक्रिय,तटस्थ,निवडरहित निरीक्षण करणे शक्य आहे ?याचे उत्तर होय आहे. ते तसे शक्य आहे किंबहुना हेच ध्यानाचे प्रवेशद्वार आहे .
    ध्यानाच्या प्रवासात कुठलाही नकाशा नसतो ,काहीही वेळापत्रक नसते .कधी, कसे, केव्हा हे प्रश्नच हद्दपार असतात .हि अशी साहस यात्रा आहे कि निधड्या छातीचे अन तळमळीचे योध्येच हा मार्ग पकडतात .

(क्रमशः)
विप्र