दुष्काळ

Started by केदार मेहेंदळे, October 07, 2013, 01:51:55 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

 आजही फसवून गेला, मेघ काळा मौसमी
मरणही न येते मला, अन म्हणे मी संयमी

फासावर किती लटकले, मेले किती आजही
डॉलर, रुपया, महागला, हीच मोठी बातमी

ढोर मेले, पोर सुकले, झरला ना अश्रू तरी
विजमाफी, कर्जमाफी, हीच घोषणा नेहमी

बाभूळी काटे संपले, पोट न जळले तरी
बघण्यास आले त्याची, खादी होती रेशमी

गवत सुकले, झाड जळले, अन कुठे ना थेंबही
देवाने केली बघ ही, तव चितेची बेगमी 

केदार  ...     

santoshi.world

nice poem kedar ......... moving it to Gambhir Kavita .........

केदार मेहेंदळे


sweetsunita66


Tingyachi aai

अप्रतिम... kharach...

मिलिंद कुंभारे

ढोर मेले, पोर सुकले, झरला ना अश्रू तरी
विजमाफी, कर्जमाफी, हीच घोषणा नेहमी

आजही फसवून गेला, मेघ काळा मौसमी

pharach chan aahe gazal....... :(

Akash kamble

खरच खुप छान आहे

vinod.patil.12177276

केदारजी खुप सुंदर