रात्र रात्र ....

Started by शिवाजी सांगळे, October 07, 2013, 04:15:41 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

रात्र - रात्र

आठवणीचे धागे
सोडवू नकोस
गुंता मात्र वाढत राहील...
फाटक्या आयुष्याला
ठिगळ लावू नकोस
चिंध्याचा ढीगच होईल...

चिंध्याची उशी करशील?
डोकं टेकायला?

झोप येईल तुला...?

मग बसशील गोंजारत
जसा तुझा हात
मझ्या केसांवरून

नको ती सवय
लावून घेउस उगाच

माझ्यासारखी
उरी कवटाळण्याची...

रात्र ... रात्र



©शिवाजी सांगळे sangle.su@gmail.com - +919422779941
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९