स्वातंत्र्य तुमच्याच हाती

Started by SANJAY M NIKUMBH, October 08, 2013, 08:03:06 AM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

स्वातंत्र्य तुमच्याच हाती
================
कोठे घेऊन जाणार आहेस
हा धन संचयाचा साठा
हिरे माणिक मोती
अन बंदिस्त पेटीतल्या नोटा

खाली हात आला आहेस
रिकामाच जाणार आहेस
सोबत येणार नाही
इवलासा एक लोटा

सारे काही पक्षासाठी
सांगत असतो जगाला
फसवीत असतो तेव्हा
स्वतःच्याही मनाला

ना पक्ष राहिलं ना तू
राहिलं फक्त माती
तुम्हीच लुटलं देशाला
तो जाईल दुसऱ्याच्या हाती

तू तर मरणारच आहेस
मग काही चांगले करून जा
फक्त आप्तांचच नाही तर
समाजाचं ऋण फेडून जा

हि धरती भिक मागते तुला
जिने सर्व तुला बहाल केले
स्वातंत्र तिचे घालवू नकोस
शत्रू तर आहेतच टपले 

नाही बघवत माझ्या डोळ्यांना
उतारवयात तुला अटक होतांना
कुणी घेईल का धडा यांच्यापासून
अक्कल येईल कां राजकारण्यांना

आपसातच नका लढू तुम्ही
गाडून टाका जाती धर्माच्या भिंती
तेव्हाच तुम्ही करू शकाल
शत्रूंच्या मनसुब्यांची माती

पुन्हा सुजलाम सुफलाम करा
तुम्हीच या धरतीला
तुमच्याच हाती आहे सगळे
टिकवा तुम्हीच तुमच्या स्वातंत्र्याला .
========================
संजय एम निकुंभ , वसई
दि. ८ . १० . १३ वेळ : ८.०० स.       






santoshi.world