गुन्हा तरी काय केला…??

Started by सतीश भूमकर, October 09, 2013, 10:14:56 PM

Previous topic - Next topic

सतीश भूमकर

एक कन्या होती अतिसुंदर
शृंगाराच तिला भलतं वेड
येता-जाता आरशात पाही
स्वतःलाच पाहून हसत राही

तिच्यायाच हसण्याने कहर झाला
तो आरसाही तिच्या रुपाला भुलु लागला
नकळतच तिच्या प्रेमात पडू लागला
अन तिच्या हसण्याला बघत जगू लागला

पण एके दिवशी न जाने
तिचा काय तोल गेला
अन हातातला आरसा तीने
भिंतीवर भिरकावून दिला

कळलंच नाही त्या आरशाने
गुन्हा तरी काय केला...??
प्रेम केलं जिच्यावर तिच्याच हातून
मरण्याचा योग नशिबी त्याच्या का आला...??

@सतीश भूमकर