!! हे सूर्य !!

Started by शिवाजी सांगळे, October 10, 2013, 11:55:53 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

सुर्योदय - सूर्यास्त
अनंत काळ चालणार चक्र
पहात होतं ...
द्रौपदीच वस्त्रहरण, अन
अहिल्येचा उद्धार,
पहात होत....
जनांचा स्वार्थ, अन
तथागताचा त्याग,
जुलमी हिंसाचार , अन
गांधीचा अहिअसयाग !

सुर्योदय - सूर्यास्त
अनंत काळ चालणार चक्र
पहात आहे...
अबलेवरचा बलात्कार,
स्वार्थाच्या बाजारातील
निवडून दिलेल्या राजाचा,
न संपणारा, भ्रष्टाचार, व्यभिचार !

पहात आहे....
जळणार तंदुर अन
ऐकली आहे...
अमृताची आर्त किंकाळी,
हे सूर्य ....
थांबेल का हे चक्र?
तूझ्या जीवनदायी चक्रा सोबत?
कि
तूच थांबशील?

© शिवाजी सांगळे sangle.su@gmail.com  +919422779941
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

dipak chandane

मस्त कविता लिहिली आहे

दर्पण दिपक गोनबरे

मांडलेले विचार फार आवडले मला, शेवटचा शब्द "तूच थांबशील?" काळजाला स्पर्श करून गेला. तुमच्या इतर कविता ही खुप सुंदर आहेत, कविता लिहत रहा आणी आम्हाला प्रेरणा मिळत राहूदे... ;D

शिवाजी सांगळे

आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद, असेच प्रेम राहू दया.....
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९