दहा बाय बारा

Started by SANJAY M NIKUMBH, October 10, 2013, 07:43:58 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

दहा बाय बारा ..................संजय निकुंभ
=========
दहा बाय बाराच्या खोलीत
आम्ही सगळे रहायचो
चार भावंडे असूनही
मस्त मज्जेत जगायचो

आंघोळीची मोरी तर
घराबाहेरच होती
उघड्यावर आंघोळ करण्याची
गम्मतच वेगळी होती

पावसाळ्यात आंघोळ करण्यासाठी
पाण्याचीही गरज नसे
जेव्हा पाऊस येईलं
तेव्हा आंघोळ होत असे

छत म्हणून घरावरती
पत्रे होते टाकलेले
गर्मीत तर अंग अंग
होत असे चिंब भिजलेले

एवढ्या छोट्या घरांतही
पाहुण्यांची वर्दळ असे
आम्हां भावांना झोपण्यासाठी
त्या पत्र्यांचा आसरा असे

कधीच आले नाही मनात
घर अपुले छोटे आहे
जे होते आमुच्यासाठी
वाटे नंदनवन आहे

आज तीन रुमचे घरही माझ्या
दोन मुलांना छोटे वाटते
खरंच हे छोटे पडतेय
माझ्या मनासही पटतेय

कसे राहत होतो आम्ही
त्या घरांत प्रश्न पडतोय
या फ्ल्याट संस्कृतीपेक्षा
तो वाडा आज आठवतोय .
==================
संजय एम निकुंभ , वसई
दि.१० . १० . १३  वेळ  : ७ . १५ संध्या .