ओढ

Started by सतीश भूमकर, October 12, 2013, 12:13:51 AM

Previous topic - Next topic

सतीश भूमकर

ती चांदणी म्हनाली चंद्राला,
'मी तुझ्यावर इतकं रे प्रेम करते,
तरी तुझी नजर त्या धरतीकडे का असते?'

मग चंद्र म्हणाला चांदणीला,
'अग ढगांचं संकट जेव्हा माझ्यावर येते,
तेव्हा तू मला एकट्याला सोडून जाते'

पण अमावस्या असो वा पोर्णिमा
ती बिचारी धरती माझीच वाट बघत असते

@सतीश भूमकर