!! घुसमट !!

Started by शिवाजी सांगळे, October 12, 2013, 05:02:24 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

बातमी तुझ्या गावची
नुसतीच कानी आली !
भरलेली जखम उरीची
पुन्हा भळभळून आली !!

सरीं सोबत पावसाच्या
मृदाही दरवळून गेली !
हूर-हूर मनातल्या मनाची
मनालाच सांगून गेली !!

मोगरा केसांत माळलेला
अलगद मोकळा झाला !
स्पर्शगंध हवा हवासा
सर्वांगात भरून गेला !!

रोमांचक क्षणाचा पिसारा
हलकेच उलगडून आला !
जाणिवेने निसटल्या क्षणांच्या
जीव घुसमटून गेला !!



© शिवाजी सांगळे sangle.su@gmail.com  +919422779941
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९