फसवणूक...

Started by शिवाजी सांगळे, October 12, 2013, 05:06:46 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे


पाऊस काहीतरी घेऊन आला,
आठवणीना  पुन्हा भिजवून गेला....

लपंडाव कसा पावसाचा?
ऋतुचक्र मुळी वेडावलेले !
स्मरता नृत्य दामिनीचे,
नभ पुनःपुन्हा व्याकुळलेले !!

लपवायचे होते जेव्हा उसासे,
घनघोर मेघ कमी आले !
वळताच पाठ तिची,
फिरून आभाळ हे फाटलेले !!

थेंबात पावसाच्या जरी,
लपविता अश्रु आले !
केली फसवणूक डोळ्यांनी,
मनीचे भाव सांगून गेले !!


© शिवाजी सांगळे sangle.su@gmail.com  +919422779941
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शिवाजी सांगळे

#1

पाऊस काहीतरी घेऊन आला,
आठवणीना  पुन्हा भिजवून गेला....

लपंडाव कसा पावसाचा?
ऋतुचक्र मुळी वेडावलेले !
स्मरता नृत्य दामिनीचे,
नभ पुनःपुन्हा व्याकुळलेले !!

लपवायचे होते जेव्हा उसासे,
घनघोर मेघ कमी आले !
वळताच पाठ तिची,
फिरून आभाळ हे फाटलेले !!

थेंबात पावसाच्या जरी,
लपविता अश्रु आले !
केली फसवणूक डोळ्यांनी,
मनीचे भाव सांगून गेले !!


© शिवाजी सांगळे sangle.su@gmail.com  +919422779941
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९