रित्या पेल्यास विचार ..?

Started by शिवाजी सांगळे, October 12, 2013, 05:12:00 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे


नसण्याने सोबत तूझी,
किती एकाकी
मला वाटले होते ?

नीज येण्या अगोदर,
डोळ्यात कोणते
स्वप्न दाटले होते ?

उरातून कळ निघतांना,
हृदयातून रक्त
किती सांडले होते ?

रित्या पेल्यास विचार,
पितांना मदिरेसह
अश्रु किती होते ?



© शिवाजी सांगळे sangle.su@gmail.com  +919422779941
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९