दुष्काळ दुपारी ...

Started by शिवाजी सांगळे, October 12, 2013, 05:15:53 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

पाउलवाटेवर त्या गेलो
बोरीचे झाड तेच होते,
फरक इतकाच होता,
झाडाला बोरही नव्हते !!

डींक बाभूळ फुलांचा ,
मन चौखूर शोधीत होते,
दुपारी डोळ्यांना तेव्हा,
काटेच बोचत होते !!

पाणवठ्यावर गुरांच्या,
घुंगरु सांडले होते,
डोळ्यात फांदीवरल्या,
दवबिंदु गोठले होते !!

सुकवून वारे नभांना,
एकाकी निशब्द होते,
सुपही माजघरात,
जात्यावर झोपले होते !!



© शिवाजी सांगळे sangle.su@gmail.com  +919422779941
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९