दुष्काळ दुपारी ...

Started by शिवाजी सांगळे, October 12, 2013, 05:16:09 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे


त्याच पाउलवाटेवर गेलो,
बोरीचे झाड तेच होते,
फरक इतकाच होता,
झाडावर एकही बोर नव्हते !!

बाभूळ फुलांचा डींक,
मन चौखूर शोधीत होते,
डोळ्यांना दुपारी तेव्हा,
काटेच फक्त बोचत होते !!

पाणवठ्यावर गुरांच्या,
घुंगुर मणी सांडले होते,
डोळ्यात फांदीवरल्या,
दवबिंदु ठार गोठले होते !!

वारे सुकवून नभांना,
निशब्द एकाकी पहुडले होते,
जात्यावर माजघरात तेव्हा,
सुप शांत लवंडले  होते !!



© शिवाजी सांगळे sangle.su@gmail.com  +919422779941
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

शिवाजी सांगळे

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

sweetsunita66


शिवाजी सांगळे

सुनिता धन्यवाद, आणि एक, माझ्या एका कवितेवर विडीयो बनविलेला आहे, कविता आहे "माझी मुंबई" you tube / face book वर सुद्धा पाहू शकता, आपला अभिप्राय अपेक्षित आहे.....
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९