प्रेम आलं जीवनात

Started by SANJAY M NIKUMBH, October 13, 2013, 07:53:19 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

प्रेम आलं जीवनात
===================

ती माझी नाही होऊ शकणार
म्हणून काय झालं
हे माहित असूनही जीवापाड
तिच्यावर प्रेम झालं

आपले रस्तेच आहेत भिन्न
हे तिलाही ठाऊक होतं
तरी तिचं मनही
माझ्या प्रेमात लीन झालं

हे प्रेमच आहे जगावेगळ
मनाचं मनावर झालेलं
म्हणून कधीच मनामध्ये
शारीरिक आसक्तीच बीज नाही रोवलं

आहोत जरी दूर तरी
आयुष्य एकमेकांच झालं
प्रेम आलं जीवनात
जगणं खूप सुंदर झालं 
===================
संजय एम निकुंभ , वसई
दि. १३ .१० . १३  वेळ  : ७ . ३० संध्या .         

sappubhai

Khup chhan...


मराठीबोली.इन लेखन स्पर्धा.[/size]बक्षिसे.प्रथम परितोषिक - शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय + मराठीबोली.कॉम वरील कोणत्याही पुस्तकावर रुपये १०० ची सवलत.द्वितीय परितोषिक - मराठीबोली.कॉम वरील कोणत्याही पुस्तकावर रुपये १५० ची सवलत.

तृतीय परितोषिक - मराठीबोली.कॉम वरील कोणत्याही पुस्तकावर रुपये ५० ची सवलत.
अधिक महितीसाठी भेट द्या :
http://marathiboli.in/marathiboli-in-competition/[/size][/font]