सखी बावरी

Started by केदार मेहेंदळे, October 14, 2013, 01:58:02 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

Ramesh Thombre...सर मला म्हणाले होते की छान कविता वाचल्या की आपोआपच आपलं मन त्याच form मध्ये विचार करतं आणि तसच लिखाण होतं. त्यांचे "प्रियेचे अभंग" वाचून मला त्याचा प्रत्यय आला. काल सौ. Shailaja Shevade यांचा 'सूरविभोरी ' हा कविता संग्रह वाचून मला त्याचा पुन:प्रत्यय आला. या कवितांमध्ये असलेले काहीसे अव्यक्त असं काहीसं मला जाणवलं आणि मला खालील ओळी सुचल्या. ...

सखी बावरी

पैल किनारी कातर वेळी
मध...ुर तान ही कुणी छेडली
ऐल किनारी साद ऐकुनी
हळवी झाली सूर बावरी

क्षितीज रंगले लाल केशरी
माळ आभाळी शुभ्र खगांची 
भारावलेल्या संध्या समयी
कातर झाली प्रिया सावळी

मंद झुळूक ती पश्चिमेची
खुल्या बटांना छेडून गेली
भास सख्याचा होता अवचित
गहिवरली ती सखी बावरी

केदार...

sweetsunita66