प्रेम केल्याशिवाय कधीच कळत नाही...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., October 15, 2013, 09:47:48 PM

Previous topic - Next topic
कसं विसरु मी तुला,
माझे मलाच कळत नाही,
नको ते प्रयत्न केले मी,
पण तुला विसरताच आले नाही.....

कसं विसरु मी तुला,
माझे मलाच कळत नाही,
न आठवावं मी तुला,
पण आठवल्याशिवाय करमत नाही.....

कसं विसरु मी तुला,
माझे मलाच कळत नाही,
न रडावं तुझ्यासाठी,
पण रडल्याशिवाय झोपच येत नाही.....

कसं विसरु मी तुला,
माझे मलाच कळत नाही,
न झुरावं तुझ्यासाठी,
पण झुरल्याशिवाय राहवत नाही.....

कसं विसरु मी तुला,
माझे मलाच कळत नाही,
न गुंताव तुझ्यात,
पण गुंता काही केल्या सुटत नाही.....

कसं विसरु मी तुला,
माझे मलाच कळत नाही,
न फसावं प्रेम जाळ्यात तुझ्या,
पण एकदा फसल्यावर माघार घेता येत नाही.....

कारण ???

प्रेम केल्याशिवाय कधीच कळत नाही.....

प्रेम केल्याशिवाय कधीच कळत नाही.....
:'( :'( :'(

_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)

स्वलिखित -
दिनांक १५-१०-२०१३...
सांयकाळी ०८,१६...
© सुरेश सोनावणे.....