आज खुप दिवसांनी तुझ्या आठवणींत जगलो...

Started by Ankush S. Navghare, Palghar, October 16, 2013, 12:43:41 AM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

तुझे ते बोलके डोळे
लोभसवाणा चेहरा
डोळे बंद होते तरी
डोळे भरून पावलो
आज...
सगळे तसेच्या तसेच होते
काही बदलले नव्हते
मी तु आपल्या आठवणी
मनांत दुख होते तरी
खुप खुप हसलो
आज...
तु अचानक बदललीस तो दिवस
मग हळू हळू बदललेले तुझे वागणे
मला कळतच नव्हते की आपण
कुठे आणि कसे चुकलो
आज...
नंतर पूर्ण थांबलेला संवाद
तु येणार नाहीस तरी
तुझी पाहिलेली वाट
सर्व माहित असून तुझ्या
एका हाकेसाठी तरसलो
आज...
तु तुझ्या जागेवर
मी माझ्या जागेवर
बरोबर होतो आपण
आपापल्या वाटांवर
तरी का कोण जाणे
वाट चुकायची ते चुकलो
आज...
आजही तुझ्या आठवणी
आहेत तशाच आहेत
तु गेलीस मी राहिलो
पण प्रेम तसेच आहे
खात्री आहे मला
तु येशील कधीतरी
ह्याच वेड्या आशेवर आजवर
आनंदाने जगलो...
आनंदाने जगलो...

हम तेरे बिन अब रहे नहीं सकते
तेरे बिना क्या वजूद मेरा
तुझसे जुदा अगर हो जाएंगे
तो खुदसे ही हो जायेंगे जुदा

... प्रजुन्कुश
... Prajunkush








मिलिंद कुंभारे


kuldeep p


Ankush S. Navghare, Palghar


Ankush S. Navghare, Palghar


Mayur Jadhav

आजही तुझ्या आठवणी
आहेत तशाच आहेत
तु गेलीस मी राहिलो
पण प्रेम तसेच आहे
खात्री आहे मला
तु येशील कधीतरी
ह्याच वेड्या आशेवर आजवर
आनंदाने जगलो...
आनंदाने जगलो...


khup mast ani chhan.

Çhèx Thakare