काही कळेना मना कोण कुणाशी खेळत असतं

Started by SANJAY M NIKUMBH, October 16, 2013, 09:44:11 AM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

काही कळेना मना कोण कुणाशी खेळत असतं
==============================
जे नशीबात असतं ते ह्रदयात... नसतं
जे ह्रदयात असतं ते नशीबात...नसतं
काही कळेना मना कोण कुणाशी खेळत असतं

जे दैवात असतं ते नियतीच्या मनात नसतं
जे नियतीच्या मनात असतं ते कळत नसतं
काही कळेना मना कोण कुणाशी खेळत असतं

जे जीवनात नसतं ते आयुष्यात येत असतं
जे आयुष्यात नसतं ते जीवनाचा भाग बनून जातं
काही कळेना मना कोण कुणाशी खेळत असतं

जे दूरच असतं ते जवळ वाटत असतं
जे जवळ असतं ते आपलं वाटत नसतं
काही कळेना मना कोण कुणाशी खेळत असतं

खरं प्रेमही असंच असतं जरी ते भेटत नसतं
तरी एकही क्षण मन प्रेमावाचून जगू शकत नसतं
काही कळेना मना कोण कुणाशी खेळत असतं .
---------------------------------------------------------
संजय एम निकुंभ , वसई
दि . १५ . १० . १३ वेळ : १० .३० रा.