तू आणि मी …….

Started by Mayur Jadhav, October 18, 2013, 09:42:55 AM

Previous topic - Next topic

Mayur Jadhav

तू  आणि मी .......   

तू हेलो म्हणतेस आणि
माझ्या काळजाच्या कोप-यात एक छोटंसं घर करतेस
तू हसतेस आणि
माझ्या मनात आनंदाचा सुगंध बनून फुलतेस
उद्या भेटूया का आपण असे म्हणतेस आणि
माझा एकांत क्षणात दूर करतेस
कधीकधी नकळत रागावतेस आणि
माझ्या डोक्यातील विचारांची धांदल उडवतेस
खूप आठवण येते तुझी म्हणतेस आणि
माझ्या दिवसाही मला पडणा-या स्वप्नात दिसतेस 
अधीमधी blank sms करतेस आणि
मला विसरलो नसतानाही तुझी आठवण करून देतेस
तुझे मोबईलचे बिल खूप येतं म्हणतेस आणि
तुला  रोज call केल्यावर ठेउका ठेउका म्हणल्यावर रागावतेस .

मयूर जाधव
कुडाळ  (सातारा) 
+918888595857.