माझे न राहिले गं

Started by shailesh.k, October 19, 2013, 04:30:13 PM

Previous topic - Next topic

shailesh.k

मम भाव अंतरीचे
माझे न राहिले गं
हरवून मात्र गेले
तव प्रीतीच्या कुशीत...

रातराणी ती माझ्या दारी 
माझी न राहिली गं
दरवळून हळूच गेली
तव सुगंधी झुळूक...

त्राण माझीया देहाचे
माझे न राहिले गं
अर्पुन सर्व गेले
तव प्रेमळ मिठीत...
 
अंगणी कळी गुलाबी
माझी न राहिली गं
गुंफून रंग गेली
तव केसांच्या बटांत... 

माझ्या या गं ओळी
माझ्या न राहिल्या गं
सुचवून शब्द गेल्या
तव वर्णनाचे गीत...

Çhèx Thakare


सतीश भूमकर



Jawahar Doshi

Kavita phar sundar aahe. Hi kavita kunachi Aahe?