गुलमोहोर

Started by शिवाजी सांगळे, October 22, 2013, 08:34:52 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे



तांबूस किरणा सोबत,
पहाटे पहाटे
फुललीस तू...
गुलमोहोरा सारखी !

बिलगलीस अलगद
हळू हळू
वेटोळ्यात तू...
जुई सारखी !

उद्गारलीस अस्पष्ट ,
धीमे धीमे...
बावरलीस तू...
अबोली सारखी !

आकसलीस अजाणता,
पुनःपुन्हा
विसावलीस तू...
निशीगंधा सारखी !


© शिवाजी सांगळे sangle.su@gmail.com  +919422779941
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

payal Salgonkar


शिवाजी सांगळे

धन्यवाद, पायलजी ....
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९