कवितेनी माझ्या कधी

Started by विक्रांत, October 24, 2013, 08:54:59 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

कवितेनी माझ्या कधी
जग बदलणार नाही
मारवाडी माल कुठला   
स्वस्त विकणार नाही

गल्लीतील दादा कधी
नाका सोडणार नाही
फुटपाथी मला कधी
चालता येणार नाही

तोच माझा पगार नि 
हप्ते थांबणार नाही
स्वप्न गाडी बंगल्याचे
संपूर्ण होणार नाही

शब्दांचा अन पोटाचा
मुळीच संबंध नाही
विकुनी कुणी कविता
धनिक होणार नाही

ज्ञानदेव तुकाराम
नाणी चलनी आहेत
प्रकाशका माहित ते
काही मागणर नाही

माझेही यात मित्र हो 
चुकले असेल काही
कवी झालो तरी कधी
लाचार होणार नाही

कुणासाठी कश्यासाठी
प्रश्न मला न पडती
नांदतो सुखात सदा
झिंग ही सोडणार नाही

विक्रांत प्रभाकर

मिलिंद कुंभारे

विक्रांत,
असे लिहायचे होते का ......

कवितेनी माझ्या कधी
हे जग बदलणार नाही ....

छान .... :)