अंतरीची वेदना

Started by मिलिंद कुंभारे, October 26, 2013, 11:43:04 AM

Previous topic - Next topic

मिलिंद कुंभारे

मित्रानो पहिल्यांदाच गझल लिहिलीय, जमलीय का ते सांगा ....
वृत्त : देवप्रिया
( गा ल गा गा ... गा ल गा गा ...गा ल गा गा ...गा ल गा )

अंतरीची वेदना

रोजच्या स्वप्नात माझ्या, येउनी जातेस तू
आसवांचा प्रांत मागे, सोडुनी जातेस तू ......

बांध माझ्या भावनांचा, फोडुनी जातेस तू
अंतरीच्या वेदनांना, छेडुनी जातेस तू ......

सांजवेळी तारकांना, पेटवुन जातेस तू
काळजाशी घाव ओला, ठेवुनी जातेस तू ......

सागराच्या वादळाला, झेलुनी जातेस तू
रंगलेला डाव सारा, मोडुनी जातेस तू ......

रेशमाच्या बंधनाला, तोडुनी जातेस तू
श्वास माझा गुंतलेला, रोखुनी जातेस तू ......

मिलिंद कुंभारे

sweetsunita66

खूप छान !!अभिनंदन !अजून अश्याच कवितांची मेजवाणी मिळू द्या आम्हाला !!!
मला ते वृत्त मात्रा  काही कळत नाही ,माझ्या मनाला भिडल्या त्या कविता मला आवडतात . त्या साठी मी मधुरा ,केदार ,कवी विजय आणी तुमचे मनापासून अभिनंदन करते ... असेच सगळे लिहित राहा .............

मिलिंद कुंभारे


Çhèx Thakare

छान न सेम प्रश्न जो सूनिता ने विचारलाय

Çhèx Thakare

छान न सेम प्रश्न जो सूनिता ने विचारलाय

मिलिंद कुंभारे

चेतन, sweetsunita...
धन्यवाद ...... :)

वृत्त आणि मात्रा सांभाळून कविता किंवा गझल लिहिणे खरच खूप कठीण आहे. हि गझल लिहिताना त्याचा प्रत्यय आलाय मला. पण अश्या कविता किंवा गझल खरच अप्रतिम असतात. वाचाव्याश्या वाटतात. त्यामुळे आता मी वृत्त आणि मात्रांशिवाय कविता करायचे टाळतच असतो, पण तरीही राहवत नाही. तुम्ही पण प्रयत्न करून बघा, नक्कीच जमेल.

पुन्हा एकदा आभार.

vinod.patil.12177276

मिलिंदजी खुपच छान ..वृत्त मात्रा समोर ठेऊन मलाही कविता लिहायला जमत नाही पण प्रयत्न नक्की करेन .खुप छान आहे ग़ज़ल.

मिलिंद कुंभारे