ती आणि तिचा एकांत

Started by kavita.sudar15, October 26, 2013, 07:42:06 PM

Previous topic - Next topic

kavita.sudar15

ती आणि तिचा एकांत,
दोघेही असतात नेहमी शांत.....!!!!
कधी हसत खेळत बागडणारी,
आता नेहमी असते मुग्ध राहणारी.....!!!!
प्रेमाच्या दुनियेत कधी काळी हरविलेली,
विश्वासाचे गीत आणि मांगल्याची सनई या गोड स्वप्नात पुर्णता बुडलेली,
पण कधीच या स्वप्नांना तिच्या वास्तवाचा बहर न येता पालवी नाही फुटली.....!!!!
झिजली सारी स्वप्ने चंदना समान,
तरी ती आहे खुश वेली समान.....!!!
प्रेमाची शर्यत कधीच जिंकता नाही आली तिला,
सारे काही आठवणीतच शोधून मिळते हिला....!!!!
बिनधास्त, धाडसी असे होते तिचे चित्र,
पण आत्मविश्वास गमावून तिचे आयुष्य झाले विचित्र.....!!!!
बडबडी सारे म्हणत तिला, हसत राहणे सतत तिची खासियत,
शब्दच रूसले तिचे तिच्यावर, आठवणीत कुणाच्या तरी असते सतत झुरत.....!!!!
नदिच्या वाहत्या पाण्यासारखी ती खळखळणारी,
आजही ती हसते पण स्वताची दुखे लपवत सारी....!!!!
पुन्हा स्वतास तिला भेटायचे आहे,
स्वतातच तिला पूर्वीची ती शोधायची आहे....!!!!
प्रयत्न तिचे आटोकाट चालुच असतात,
पण का कुणास ठाऊक? कुठे ना कुठे कमीच पडतात....!!!!
पुन्हा एकदा सरीतेसमान तिला वाहायचे आहे,
पाखरासारखे पुन्हा स्वछंद तिला बागडायचे आहे....!!!! पुन्हा एकदा तिला नव्याने उभे राहायचे आहे,
सारे काही तिला शुन्यातूनच मिळवायचे आहे....!!!!!!
सारे काही तिला शुन्यातूनच मिळवायचे आहे.....!!!!!!! @कviता@