छावा

Started by सतीश भूमकर, October 27, 2013, 08:59:09 PM

Previous topic - Next topic

सतीश भूमकर


धन्य धन्य तो दुर्ग
पुरंदर झाला
जन्मास जिथे आमचा
शिवपुत्र संभाजी आला

रणांगणी मग तो असा
काय गरजला
सिह्गर्जनेने या दिल्लीतला
औरंगजेबही हादरला

पण येथे ही कुंपणानेच
शेताशी घात केला
अन क्रांतिसूर्य आमचा
हाल-हाल होऊन गेला

कधी ना मोडला,कधी ना झुकला
फक्त स्वधर्मासाठी तो लढला
मग या जाणकारांनी आमचा छावा
बाटली अन बाईच्या कुशीतच का रंगवला...?


@सतीश भूमकर