वेड्या मनाची वेडी आशा

Started by सतीश भूमकर, October 30, 2013, 06:40:19 PM

Previous topic - Next topic

सतीश भूमकर

पश्चिमेला सूर्य जस-जसा
खाली सरकतो,
आठवणीचा बाग तुझ्या तस-तसा
मनी माझ्या बहरतो. 

होते मध्यरात्र तरीही मी
निद्रा माझी सावरतो
पहाटेच्या त्या झोपेसाठी
किलकिलनाऱ्या डोळ्यांना आवरतो

होता पहाट लगेच माझे,
डोळे आतुरतेने बंद होतात.
अन स्वप्नातही माझ्या
तुझी-माझीच स्वप्ने येतात

पण वाचणारयास अजूनही नाही कळलं
की माझे डोळे पहाटेच का बंद होतात..??
कारण या वेड्या मनाला आजही वाटत कि,
पहाटे बघितलेली सगळीच स्वप्न खरी होतात.

@सतीश भूमकर

Ankush Navghare


Pratej10

पण वाचणारयास अजूनही नाही कळलं
की माझे डोळे पहाटेच का बंद होतात..??
कारण या वेड्या मनाला आजही वाटत कि,
पहाटे बघितलेली सगळीच स्वप्न खरी होतात.


.........................khoop chan :) Avadali kavita

सतीश भूमकर