क्षण

Started by Pratej10, October 30, 2013, 09:22:25 PM

Previous topic - Next topic

Pratej10

कोणी तरी आपल आहे अस सातत्याने वाटत असतं....
त्याच्या येण्याच्या वाटेकडे डोळे लागलेले असतात....
फोनची एक रिंग देखील, त्याचाच आभास असतो.... 
त्याच्या एका मेसेजसाठी पुरी रात्र जगलेली असते...।

पण ....  पण त्याला मात्र यातील कशाचीच जाणीव नसते....
तो मस्त पुढे चाललेला .... पण ती मात्र तिथेच स्तब्ध झालेली....
स्वत:तील बदल ओळखूनहि तो त्रयस्थपने वागणारा....
अन ती मात्र अजूनही त्याच क्षणांना गोंजारत निशब्द...
जे कधीच पुन्हा येणार नाहीत......कधीच येणार नाहीत...। 

Amol.virkar

तुझ्या श्वासात राहत होतो मी,
तुझ्या आठवणीत जगत होतो मी,
रोज रात्री स्वप्नात माझ्या,
फ़क्त तुलाच पाहत होतो मी,
तुच जिंकावीस म्हनुन स्वत:लाच हरवत होतो मी...


पावलास काळजी वाटते तुझी,
गप्प बसलीस की झोप उडते माझी,
क्षणोक्षणी सुखात रहावीस म्हणून झटतोय मी
आयुष्यभर एकत्र राहण्याचं स्वप्न पाहतोय मी
तुला मिळवण्यासाठी साऱ्या जगाशी  लडतोय मी....