उधळले जीवन तुझ्यावर

Started by SANJAY M NIKUMBH, October 31, 2013, 07:33:01 AM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

उधळले जीवन तुझ्यावर
========================
साऱ्या जगाशी नाळ तुटून गेलीय
इतकी तुझी धुंदी चढलीय मनावर
तुला विसरण्या गाढ झोपून जातो 
तुझाच अंमल असतो माझ्या स्वप्नांवर

जमणार नाही हा असला छंद
किती बिंबवल होतं माझ्या मनावर
तू घेऊन आलीसच असं प्रेम आयुष्यात
कि उधळून दिले काळीज तुझ्या काळजावर

आताही तुझ्या आठवणी घेऊन फिरतो
माझा श्वास जगतो जगलेल्या त्या क्षणांवर
इतका डूबलोय तुझ्या प्रेमात की
तू दिसल्याशिवाय जळणार नाही मी सरणावर .
===============================
संजय एम निकुंभ , वसई 
दि.  ३१ . १० . १३  वेळ : ७ . १० स.       

garrolouspandit