ऋतू प्रेमरंगी

Started by मिलिंद कुंभारे, October 31, 2013, 09:36:29 AM

Previous topic - Next topic

मिलिंद कुंभारे

पहिल्यांदाच वृत्तात लिहिलेली कविता ...
एक प्रयत्न .... त्रुटी आढळल्यास अवश्य कळवा .... तसेच दुरुस्तीही सुचवा ......

वृत्त भुजंगप्रयात-

ल गा गा    ल गा गा    ल गा गा    ल गा गा
१  २  २     १  २  २     १  २  २     १  २  २

ऋतू प्रेमरंगी

मला आठवेना, तुला आठवेना
कशी  कोण जाणे, कधी भेट झाली ......

कशी सांज आली, कधी रात झाली
कळेना जराही, मलाही तुलाही ......

नभी चांदण्यांची, किती आज गर्दी
सखी ये जराशी, अशी बाहुपाशी......

अता सोसवेना, दुरावा जराही
सखी सांजवेळी, जरा घे उभारी ......

नको साथ सोडू, अश्या सांजवेळी,
नको बंध तोडू, ऋतू प्रेमरंगी......

तुझा ध्यास सखये, किती प्रीत न्यारी
कळेना तरी, का मना वेड लावी ???

मिलिंद कुंभारे

Ankush S. Navghare, Palghar


मिलिंद कुंभारे

Prajunkush,

काय सांगू ,
वेडच लागलेय आज काल मला वृत्त अन मात्रांचे....  :D :D :D

thanks a lot ........ :)

मिलिंद कुंभारे