भ्रम

Started by Mangesh Kocharekar, October 31, 2013, 09:08:03 PM

Previous topic - Next topic

Mangesh Kocharekar


     भ्रम
रोजच त्या रस्त्यांनी जायचे ,त्याला रोजच पहायचे
वाटायचे कधीतरी ओठात हसेल, नीदान  हाय म्हणेल
  डोळ्यांनी माझ्याशी बोलेल , मागोमाग चालेल
  मला पाहून खुलेल, मिटल्या ओठानीच बोलेल
स्वप्नांच्या झुल्यावर झुलवेल,माझ्या बटांशी खेळेल
मला यायला उशीर झाला तर अबोला  धरत चिडेल
   अधून मधुन दिसत होता ,स्वप्नात मला छळत होता
   रस्त्यात नको म्हणून ,झोपेतच मला भेटत होता
त्याच रूप माझ्या मनी बसल ,काळजाच्य आत खोल लपल
माझ्या जोडीदारच राजबिंड रूप मला त्याच्या नजरेत दिसलं
     त्याची मी होते दिवाणी ,मी त्याला वरले होते मनानी
     कळत नव्हत काय अघटीत घडल,त्याच दर्शन नंतर नाही झाल
  त्याच्या आठवणीने मी वेडी झाले,अन दिवस त्या वेडात  हरवले 
  वाट  पाहता पाहता मी संसाराच्या जाळ्यात अलगद अडकले 
      एके दिवशी तो  दिसला हाय कशी आहेस म्हणत हळूच हसला
      काय बोलावे मलाच  सुचेना माझा चेहरा पूर्ण  अश्रुनी भिजला
फार उशीर झाला होता हात हिरव्या बांगड्यांनी  भरला होता
मनाचा कोप-यात  मात्र तो अजूनही  तसाच उरला होता
     त्याला काहीच अर्थबोध झाला नाही अस मुळीच नव्हत
      त्याला माझ्याकडे टक लावून पाहतांना मला काहीच सुचत नव्हत     
     
                                मंगेश कोचरेकर