तुझ्या धुंदीत जगतांना

Started by SANJAY M NIKUMBH, October 31, 2013, 10:59:46 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

तुझ्या धुंदीत जगतांना
=====================
वसंत फुलून यावा ग्रीष्मातही
तसं माझं मन मोहरून येतं
जेव्हा जेव्हा तुझ्या धुंद आठवणीत
माझं मन तास अन तास रेंगाळत रहातं

माझ्या मनातलं प्रत्येक पान अन पान
तुझ्या प्रीत गंधाने बहरून जातं
माझ्या नसानसांत तो गंध पसरून
माझं सारं जगणं तुझं होऊन जातं

एक एक थेंब पावसाचा झिरपावा मनात
तशी एकेक आठवण जागते हृदयात
चांदण्यांचे सडे पडतात ओंजळीत तेव्हा
प्रत्येक चांदणीत तुझा चेहरा पाहून मन वेड होऊन जातं .
====================================
संजय एम निकुंभ , वसई
दि. ३१ . १० . १३  वेळ : १० . ३० रा.       

मिलिंद कुंभारे

चांदण्यांचे सडे पडतात ओंजळीत तेव्हा
प्रत्येक चांदणीत तुझा चेहरा पाहून मन वेड होऊन जातं . ....

मस्तच ..... :)