गझल

Started by केदार मेहेंदळे, November 01, 2013, 12:00:29 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

वृत्त : आनंदकंद
लगावली : गागा लागाल गागा / गागा लागाल गागा

गझलेस जाणण्याचा माझा प्रयास झाला
आता सुरु नव्याने माझा प्रवास झाला

साधी लागावली ही गागा लगाल गागा
शब्दांत बांधली अन  मतला झकास झाला

मोठा हुरूप माझा साधा विचार माझा
मात्रांत बांधताना भलताच त्रास झाला

आनंदकंद सार्या  वृत्तात गोड भारी
करता सराव त्याचा थोडा विकास झाला

पाहून प्रेम माझे कविता उदास बोले
गझलेचं प्रेम दैवा का आज फास झाला?

केदार...........

या गझलितला 'आता सुरू नव्याने माझा प्रवास झाला' हा मिसरा श्री सारंग भणगे यांच्या गाझलीतला आहे 

मिलिंद कुंभारे

मोठा हुरूप माझा साधा विचार माझा
मात्रांत बांधताना भलताच त्रास झाला.....

केदार दा ...
आजकाल मीही असंच काहीसं अनुभवतोय ....
:D :D :D