तुलाच पाऊस म्हणतात का रे …....

Started by Mayur Jadhav, November 02, 2013, 03:18:04 PM

Previous topic - Next topic

Mayur Jadhav

तुलाच पाऊस म्हणतात का रे .......

काळ्या-निळ्याभोर आकाशात पांढरे ढग शोधून
त्यांना घुसळ घुसळ घुसळतोस अन
वा-यालाही पिटाळ पिटाळ पिटाळतोस मग
पाण्याच्या बिंदुना एकवटतोस
तुलाच पाऊस म्हणतात का रे ........
पाण्याला धरतीवर उतरवतोस
हवाहवा वाटणारा गंध दरवळवतोस अन
पाण्याचं  जमिनीशी असलेलं नातं नकळत सांगतोस
तुलाच पाऊस म्हणतात का रे .........
घराच्या छतावरून टपटप पडतोस
ते टपटप पाणी तळहातावर पडायला व्याकूळ करतोस अन
मनातील आनंदाला इंद्रधनुप्रमाणे पसरवतोस
तुलाच पाऊस म्हणतात का रे ..........
तू येण्याची चाहूल लागताच धावपळ करतोस
आम्हाला पळव पळव पळवतोस अन
आडोशाला थांबल्यावर छोट्या छोट्या कारंजा अंगावर पडतोस मग
हसल्यासारखा मुसळधार पडतोस अन
दमलास का रे म्हणून विचारतोस
तुलाच पाऊस म्हणतात का रे ...........

मयुर जाधव
कुडाळ (सातारा )
+918888595857