तव स्पर्शुनी सारे

Started by SANJAY M NIKUMBH, November 04, 2013, 10:53:44 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

तव स्पर्शुनी सारे
=============
तव स्पर्शुनी सारे
झाले सुगंधित वारे
माझ्या मनी उमलले
प्रीतीचे मोर पिसारे

वाहले नसानसांत
ते गंधित वारे
वाजले माझ्या मनात
प्रेमाचे नगारे

गतजन्माचे धागे
त्या गंधाने जुळले रे
युगायुगाचे नाते
मनास कळले रे

गंध तुझा भरता
मना आले शहारे
हृदयास कळले आता
तूच माझी राधा रे .
=================
संजय एम निकुंभ , वसई
दि. ४ . ११ . १३  वेळ  : १० . ३० रा.