जेव्हा प्रेम कळून जातं

Started by SANJAY M NIKUMBH, November 06, 2013, 09:48:10 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

जेव्हा प्रेम कळून जातं
======================
सार काही मिळवू शकतो आयुष्यात
प्रेम मिळवता येत नाही
भाग्य लागते ते ललाटी
त्याशिवाय ती भावना कळत नाही

असेल जर ते कुणाच्या नशिबात
भेटल्याशिवाय रहात नाही
प्रेम हि भावनाच खूप वेगळी
प्रेमात पडल्याशिवाय कळत नाही

उगीच नका नावे ठेऊ प्रेमास
प्रेमासारखी गोष्ट नाही
प्रेमात पडल्यावर विचारावं मनास
हे फक्त आकर्षण तर नाही

जेव्हा प्रेम कळून जातं
कुठल्याही क्षणी सोबत करतं
एकमेकांच्या सुखासाठी धडपडून
आयुष्य दोघांच सुंदर होतं

जरी आलं नाही आयुष्यात
तरी जगणं सुंदर होतं
प्रेम हि भावना कळल्यानं
आयुष्य बदलून जातं
=====================
संजय एम निकुंभ , वसई
दि. ६ . ११ . १३ वेळ : ७ . ४५ स.