काय करावे ...?

Started by शिवाजी सांगळे, November 06, 2013, 11:00:09 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे


काय करावे कळत नव्हते,
मन कशात रमत नव्हते !

रंगात रंग खेळता खेळता,
रंगात सप्तरंग नव्हते !

मन चिंब चिंब आठवणीने,
भिजविण्या पाऊस थेंब नव्हते !

कवटाळून उरी घ्यावे सुरांना,
लयबद्ध शब्दांत भाव नव्हते !

शब्दांचे उडवून सुद्धा पतंग,
आभाळ हाती येत नव्हते !

काय करावे कळत नव्हते,
मन कशात रमत नव्हते !




© शिवाजी सांगळे sangle.su@gmail.com  +919422779941
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मिलिंद कुंभारे


शिवाजी सांगळे

मिलिंदजी धन्यवाद ...
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९