भास...

Started by शिवाजी सांगळे, November 06, 2013, 11:04:23 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे


अनोळखी गावच्या
अपरिचित वाटा,
खिन्नतेवर माझ्या
हसत होत्या !

दूर-दूर मी
चालत होतो,
सोबती तुझ्या
आठवणी होत्या !

आसमंती गूढ
खेळ रगांचा,
आपल्यात मला
गुंतवीत होता !

मंद तारकांच्या
तेवण्यात सुद्धा,
भास तुझ्या
पावलाचा होता !



© शिवाजी सांगळे sangle.su@gmail.com  +919422779941
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

केदार मेहेंदळे


शिवाजी सांगळे

आपला अभिप्राय मिळाला,
लिहिण्याचा उत्साह दुणावला !!...... धन्यवाद
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९