*** बेवडा ***

Started by SANJAY M NIKUMBH, November 07, 2013, 08:36:03 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

*** बेवडा ***
=========
आपल्याच मस्तीत
हालत डोलत
स्वतःच स्वतःशी
बोलत बोलत
रस्त्यावरून हिंडतो मी

चालतो एकटाच
शुद्ध हरपत
जिकडे तिकडे
तुला बघत
अडखळत चालतो मी

तुझ्या धुंदीत
भान हरवत
या जगास
विसरत  विसरत
तुलाच आठवतो मी

साऱ्यांना वाटतं
बेवडा झालोयं
दारू पिऊन
कामातून गेलोयं
चाललोय झिंगत झिंगत मी

फक्त तू
जाणतेस सत्य
माझ्या या
दारूण अवस्थेचे
तुझ्या प्रेमात वेडा झालो मी .
===================
संजय एम निकुंभ , वसई
दि. ७ . ११ . १३  वेळ  : ८ . १५  रा.   


kuldeep p


SANJAY M NIKUMBH