माझिया प्रियाला प्रीत कळेना

Started by lanke.amol, November 08, 2013, 08:47:42 AM

Previous topic - Next topic

lanke.amol

माझिया प्रियाला प्रीत कळेना :

तुझे ते लाजणे आणि हसणे, आता मात्र्र अनुभवायला मिळेना,
सोडून गेलीस मला अर्ध्यात, माझिया प्रियाला प्रीत कळेना.

सरले अनेक वर्ष, जीवनाने आपल्या कापले खूप अंतर,
कुणीच मिळेना तुझ्यासारखी, काय माहित काय होईल नंतर.
मान माझे भूतकाळात रेंगाळत, नव्या दिशॆस पुन्हा वळेना,
सोडून गेलीस मला अर्ध्यात,माझिया प्रियाला प्रीत कळेना.

भास होई तुझा गर्दीत, तर कधी सांजवेळी सावलीत,
तुझ्या प्रतिमेचे पाने मनाच्या पुस्क्तात माझ्या मावलीत.
सामैचे तेल सम्प्लॆ, प्रेमाची वात आयुष्यात पुन्हा जळेना,
सोडून गेलीस मला अर्ध्यात,माझिया प्रियाला प्रीत कळेना.

प्रीती तुझी नि माझी, दोघांची अगदी निरागस व खरी,
ग्रीष्मात देखील जगलो मी तुझ्या सहवासात श्रावणसरी.
आपण पाहिलेला सूर्यास्त, माझ्या जीवनी अजूनही ढळेना,
सोडून गेलीस मला अर्ध्यात,माझिया प्रियाला प्रीत कळेना.

जागलो मी अनेक रात्री, तू पाहिलेल्या स्वप्नांसाठी,
धावून थकल्यावर कळले मृगजळ असतात नेहमीच खोटी.
निघताना मागे वळून देखील नाही पाहिलेस,  मन माझेच खुळे न,
सोडून गेलीस मला अर्ध्यात,माझिया प्रियाला प्रीत कळेना.

धावलीस तू, बांधलेस स्वप्नाचे नवे इमले,
वेदाच मी होतो मला वाळूचे घर देखील नाही जमले.
तुझे लाडके प्रेमळ हट्ट,  कानी माझ्या कधीच आता छळेना,
सोडून गेलीस मला आर्ध्यात, माझिया प्रियाला प्रीत कळेना.

पंचपक्वन्न्च्या आरसात, मन होऊन निरासक्त घास आता गीलेना,
सोडून गेलीस मला आर्ध्यात,माझिया प्रियाला प्रीत कळेना.

-अमोल लंके.




मिलिंद कुंभारे