खुप काही सांगायचं होतं

Started by niteshk, November 08, 2013, 10:11:42 PM

Previous topic - Next topic

niteshk

खूप काही सांगायचं होतं पण सर्वच राहून गेलं
जे कधीच घडायचं नव्हतं तेच नेमकं घडून गेलं

खूप जुळवण्याचा प्रयत्न केला पण सर्व फिसकटलं
आयुष्याचं गणित माझं कायमच चुकलं

तुझ्या येण्याने सावरतोय असं वाटत होतं
उंच आकाशात उडतोय असं वाटत होतं

कधी आकाशातून खाली पडलो ते कळलंच नाही
तुझ्या जाण्याच्या धक्कयातून अजुन सावरलोच नाही

तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण मला आठवला
आयुष्याचा किती वेळ मी वाया घालवला

एकमेकांच्या  सहवासात आपण किती हरवून जात होतो
क्षणात विसरलीस आपण एकमेकांवर प्रेम करत होतो

कायम सोबत राहू म्हणालीस पण चार पावलं सोबत चालली नाहीस
मला एकटं सोडून जाताना डोळ्यातून टिपूससुद्धा गाळली नाहीस

दिसेनाशी होईपर्यंत पाहिले पण तू मागे वळली नाहीस
दरवेळी समजून घेतलं पण तू कधी मला कळलीच नाहीस


मिलिंद कुंभारे




शिवाजी सांगळे

" खुप काही सांगायचं होतं "

खरं आहे मित्रा, सगळ्याच असच होत,
होऊन गेल्यावर, सारं आठवायला होत!!  :o



©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

niteshk

Thnk u frnds.....
Tumha sarvanchya pratikriya pahun khup bar vatal

दर्पण दिपक गोनबरे

क्या बात है, क्या बात है....... विचार फार हृदयाला भिडले...... अक्षरशा जाणवलं

niteshk

खूप खूप धन्यवाद दर्पण.....!
तुझी प्रतिक्रिया पाहून मला अजून कविता करण्याची प्रेरणा मिळत आहे