जेव्हा तू थरारतेस...

Started by शिवाजी सांगळे, November 10, 2013, 01:30:27 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

जेव्हा तू थरारतेस

तू एक अबोल गवत फुल,
अबोलाच एक बोल होतो!

डोळ्यांच्या चांदण्यात,
मुखचंद्र पुनवेचा होतो!

थरारते अधर कंप,
श्वासाचा मग लाव्हा होतो!

विळख्यातली वेल फुले,
व्दिकरांचा पुष्पहार होतो!

अस्पष्ट गूढ हुंकार,
कोकिळेचा तो गंधार होतो!

सागर लाट उसळी,
चंद्रसागर एक स्वर्ग होतो!

नभी आरक्त लालीमा,
धरणीचा पण थरार होतो!




© शिवाजी सांगळे sangle.su@gmail.com  +919422779941
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मिलिंद कुंभारे


शिवाजी सांगळे

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

pujjwala20

नभी आरक्त...
......थरार होतो
अतिशय संदर ओळी

शिवाजी सांगळे

धन्यवाद, असाच जिव्हाळा राहो.....
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९