- ¤ कळेल मग तुला ¤ -

Started by pujjwala20, November 11, 2013, 06:56:33 PM

Previous topic - Next topic

pujjwala20

येवून बघ माझ्या बाजुला
अनुभवून बघ मी होवून मला
मी अशी का वागते
कळेल मग तुला
कुठून वाटते काळजी
कुठून दाटते डोळ्यात पाणी
कळेल मग तुला
कुठून होतात कानांचे प्राण
तूझा सुखावला आवाज ऐकण्यासाठी
कळेल मग तुला
कशी लागते आस
क्षणोक्षणीचा ध्यास
कळेल मग तुला
कसा होतो मध्यरात्रीच भास
आवेगाने घातलेली साद
कळेल मग तुला
कसा होतो कासाविस जीव
सगळ आहे तरी तुझी उणीव
कळेल मग तुला
पण आजही मला कळत नाही
याला वेड म्हणाव की वेड प्रेम
कळतच नाही

....... उज्ज्वला पाटील :(  :(

Shripad123

Kharach Chhan kavita.....

Prem he asach, 'VICHITR' ast.

Jyala aapn samajun ghet asto toch aaplyala samjun ghyayla jast vel lavat asto.

शिवाजी सांगळे

वा, छान प्रेमातल वेडेपण म्हणायचं याला.
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

Akshay Pendhare

Sundar kavita ahe..
he one sided ast sagl.. 
mhanunach mg nishkaran bhandan hotat..
ani santaap hotat...
nantar vatte are apan ase ka bollo...

pujjwala20

मनःपुर्वक धन्यवाद