मी प्रेम केलं...

Started by pujjwala20, November 12, 2013, 06:57:45 PM

Previous topic - Next topic

pujjwala20

मी प्रेम केलं

प्रेम करताना कसला
विचार करायचा नसतो
विचार करुन कधी
प्रेम करता येत नाही

मी प्रेम केलं...
मी प्रेम केलं
तुझ्या गोड हसण्यावर
तुझ्या शांत बसण्यावर
तुझ्या मनमोकळ्या पणावर
आणि वेगळ्या वाटणारया तुझ्या स्वभावावर

मी प्रेम केलं...
तुझ्या मंजुळ बोलण्यावर
मासोळी डोळ्यातील
बोलकेपणावर
तुझ्या चेहरयावरील
निरागसतेवर...
आणि तेवढ्याच शांत
मनावर
मी प्रेम केलं...
तुझ्या कधीतर रागावण्यावर
रागाने लाल झालेल्या
त्या नाकावर
लटके नाक मुरुडण्यावर
आणि गाल फुगवून बसण्यावर
मी प्रेम केलं...
तुझ्या स्वप्नांवर
इच्छा आकांक्षांवर
तुझ्या मनातील भावनांवर
तू सोसल्या वेदनांवर
आणि जीवनातील दुखःवर
मी प्रेम केलं...
तू घेतलेल्या प्रत्येक श्वासावर
ह्रदयातील स्पंदनांवर
माझ्या आठवणीत
तू जागून काढलेल्या रात्रींवर
मी प्रेम केलं...
कारण प्रेम हे करायच असत
निस्वार्थ मनान
प्रेम फक्त द्यायच असत
निरपेक्ष अंतकरणानं
मी प्रेम केलं
मनापासून मनावर
कधीतरी मलाही असच प्रेम मिळेल
खर प्रेम करणार कुणीतरी भेटेल
मी प्रेम केलं...
मलाही फक्त प्रेम मिळेल
मलाही...

¤ ¤ ¤ रेडीओवरून ऐकलेली