तू रोमारोमांत असतांना

Started by SANJAY M NIKUMBH, November 12, 2013, 10:55:09 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

तू रोमारोमांत असतांना
---------------------------
प्रीत अधुरी राहिली
असं कां म्हणू मी
तू नाहीस जीवनात
म्हणून कां रडू मी

अश्रू तर कधीच माझे
मला सोडून गेले
जेव्हा माझे मन
प्रेमात पडून गेले

तुझी साथ लाभता
क्षण क्षण उजळले
तू साद घालता
मन माझे मोहरले

आयुष्य जगणे बेधुंद
तुझ्यामुळे शिकलो मी
तू रोमारोमांत असतांना
विरहात कां जळू मी .
==================
संजय एम निकुंभ , वसई
दि. १२ . ११ . १३ वेळ : २ . १५ दु.

pujjwala20

रोमरोमात तू असताना
विरहात का जळू मी
सुंदर लाईन