हंसा मुलांनो हंसा

Started by Suhas Phanse, November 13, 2013, 09:12:11 PM

Previous topic - Next topic

Suhas Phanse

 :D हंसा मुलांनो हंसा :D
हंसा मुलांनो हंसा, हंसवा आणि हंसा
आनंदाचा प्रसार करण्या, हंसण्याचा घ्या वसा     ॥धृ॥
हास्यसडा शिंपुनी शुचिर्भुत करा आसमंत
लोकांच्या आशिर्वचनाने बना भाग्यवंत
खुल्या दिलाने वाटा हंसणे, आहे अविरत ठेवा       ॥१॥
चेहेऱ्यावरती स्मित हास्याचे तोरण बांधावे
भेटीतच दुसऱ्यांना जिंकुनी टाकावे
हास्य फवाऱ्याने साऱ्यांना प्रेमचिंब भिजवा          ॥२॥
हंसण्यामागे दु:ख स्वत:चे लपवुनी ठेवावे
हंसू आणुनी दुसऱ्यांचे दु:ख कमी करावे
हंसू वापरुनी लोकांपासुनी दु:ख दूर ठेवा              ॥३॥
हंसण्याने रागावरती ताबा घेता येतो
हंसुनी मनाचा ताणही कमी करता येतो
पिडित मनाला देण्या उभारी हास्यामृत शिंपा      ॥४॥